नवीन वर्षात तुम्हाला आर्थिक गणित नव्याने मांडण्याची गरज पडणार आहे.आता गाडी वापरायची की नाही किंवा असलेली गाडी पूजेला ठेवायची का असा प्रश्न तुम्हाला नवीन वर्षात पडू शकतो.पश्चिम आशियाई देशातल्या तणावामुळे सध्या आंतर राष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खूपच वधारले आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोलचे दर 30 टक्कांनी वाढून ते शंभरच्या घरात पोहचण्याची चिन्हं आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या भाववाढीचा फायदा रशिया, कोलंबिया, मलेशिया आणि ब्राझील या देशांना होईल. तर चीन, भारत, इंडोनेशिया, थायलंड, दक्षिण अफ्रिका आणि तुर्कीसारख्या देशांना मात्र याची जबरदस्त झळ सोसावी लागणार आहे.
येमेनमधल्या बंडखोरांचा समाचार घ्यायला सौदी अरेबिया युद्धात उतरण्याची शक्यता आहे आणि तसे झाले, तर सौदी अरेबिया इराणच्या विरोधात उभे ठाकेल. या पार्श्वभूमीवर तेलाचे भाव गगनाला भिडण्याची चिन्हे आहेत..
सध्या मध्यपूर्वेतल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या बॅरलचे भाव ८० डॉलर्सच्या आसपास आहेत. येणाऱ्या काळात त्यात ३० टक्के वाढ होऊन ते १०० डॉलर्सच्या पार जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे..
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews